अकिंचन्य धर्माच्या दिवशी झळाळले जिनबिंब अंतरी
जळात विहिरीमधल्या हलतो भावुक होउन लिंब अंतरी
सान प्रतिक हे अपरिग्रहाचे हवी तेवढी त्रिज्या घेउन
भवती अपुल्या भूमी मापे केंद्रक बनुनी टिंब अंतरी
काळ्या मेघी पाहुन डोळे नितळ साजिरे मायपित्याचे
सर कोसळली सरसर सरसर झाली सृष्टी चिंब अंतरी
मुक्तक तीन शेरांचे… मात्रावृत्त (मात्रा ३२)