लिहीन लिहीन
काही पण लिहीन
पण लिहीनच लिहीन
लिहीत राहीन लिहीत राहीन
जमेल तोवर लिहीतच राहीन
सुचेल छान छान मस्त मस्त
ते ते सारे लिहित राहीन
कशाला थांबू
कशाला अडखळू
उगाच अडखळून पडू बिडू
सापडतील ते शब्द घेईन
ओळींची गाडी पुढेच नेईन
झुक झुक झुकाक धावत राहीन
इंजिन बनून शिट्टी घालेन
हवेत धूर नाही वाफ सोडेन
हवेबरोबर वाफ निघेल
तापून तापून हलकी होईल
उंच उंच वर जाईल
मग वाफेचे ढग बनतील
ढगातून पावसाच्या धारा पडतील
मुले येतील नाचतील गातील
तळ्याच्या पाण्यात बदकासारखी तरंगतील
तळ्यातले मासे वर येतील
बदकांसंगे खेळ खेळतील
पाणी उडवतील पाणी पितील
मुले पाण्यावर नाचतील
चिंब भिजून बाहेर येतील
जमिनीवर दबक दबक चालतील
खिदळतील हसतील
आनंदच वाटतील