Vasant Gaane means Spring Song. Through this spring song, the poetess expresses a myriad of feelings and thoughts which come to her mind.
माझ्या तुझ्यातल्या त्या गोष्टी किती जपू मी
मम प्रेम भावनेला कैसे म्हणू रिपू मी
माझेच नेत्र आता बनलेत दीप-ज्योती
मिथ्या तुझ्या कथांनी आता कशी दिपू मी
सौंदर्य भावनेला आजन्म प्राशुनीया
मज सत्य लख्ख कळता का सांग रे लपू मी
ही वेल चंदनाची खिरते कणाकणाने
होऊन चिखल माती पाण्यात का धुपू मी
माझीच बाग सुंदर गाते वसंत गाणे
बर्फातल्या पहाडी का व्यर्थ मग खपू मी
अस्तित्व प्राण आत्मा देहात जाणताना
डोळ्यात पण कुणाच्या का लागले खुपू मी
आहे खरीच आहे तव साद ही ‘सुनेत्रा’
स्वर्गी इथे बसोनी तिजला कसे टिपू मी
वृत्त – गा ल गा गा, ल गा गा, गा ल गा गा, ल गा गा.