कुणी गुदगुल्या, करून हसवे, येते त्याला, त्यात मजा!
कुणी टवाळी, करून खिदळे, येते त्याला, त्यात मजा!!
सुरेख मैफल, गझल शरांची, उडती लाटा, हास्याच्या!
कुणी तिऱ्हाइत, उगाच रडते, येते त्याला, त्यात मजा!!
भुईनळ्यांची, चमचम वर्षा, पाडुन कोणी, बागडते!
कुणी फटाके, उडवित बसते, येते त्याला, त्यात मजा!!
फुलांस धुंडित, मधास प्राशित, पाकोळी अन, भृंग फिरे!
कुणी शिकारी, किड्यास पकडे, येते त्याला, त्यात मजा!!
निळी ‘सुनेत्रा’, गुलाब होउन, हिरवी पाने, पांघरता!
असेल वेडी, कुणी बरळते, येते त्याला, त्यात मजा!!
वृत्त – ल गा ल गा गा, ल गा ल गा गा, गा गा गा गा, गा गा गा.