आठवले मज वेडे सारे
पुष्प-सुगंधित झाले वारे
पापण काठी मौनी अश्रू
नकळत त्यांचे बनले तारे
मुग्ध मधुर ते रूप परंतू
मम नेत्रांवर सक्त पहारे
भेटायाला उत्सुक कोणी
म्हणुनी जपले क्षण मी खारे
माझ्या इच्छा दवबिंदूसम
पुण्य असे जणू तप्त निखारे
वाजविण्या मन तबला सुंदर
काया पिटते ढोल नगारे
प्रेम खरे पण रंग बघाया
बदलत गेले फक्त इशारे
तेल उकळण्या कढई ज्वाला
तळण्या गळण्या चाळण झारे
प्रीत सुनेत्रा टिपली जाता
अंगावरती कैक शहारे
वृत्त- गा गा गा गा, गा गा गा गा.