पाऊस यावा अंगणभर
अंगांगी काटे कुंपणभर
आवाज यावा ढगी गड गड
पडाव्या गारा छपरावर
वेचाया हातांची ओंजळ करू
मुठीत मोठाल्या गारांना धरू
मंडपी चिंब जाई नि जुई
जा ग जा चिऊ घरट्यात बाई
जा उड रे काऊ शुभ शुभ गाऊ
शिशिरात बुडण्या धारांत न्हाऊ
पाऊस यावा अंगणभर
अंगांगी काटे कुंपणभर
आवाज यावा ढगी गड गड
पडाव्या गारा छपरावर
वेचाया हातांची ओंजळ करू
मुठीत मोठाल्या गारांना धरू
मंडपी चिंब जाई नि जुई
जा ग जा चिऊ घरट्यात बाई
जा उड रे काऊ शुभ शुभ गाऊ
शिशिरात बुडण्या धारांत न्हाऊ