शुभ्र झरा – SHUBHRA ZARAA


शुभ्र झरा खळखळतो आहे
तुषार अगणित दळतो आहे

पूर्ण जरी ना कळला मजला
थोडा थोडा कळतो आहे

वेलींवरच्या कळ्या बघाया
मागे मागे वळतो आहे

जे झाले ते बरे तरीही
उगाच तो हळहळतो आहे

पदर उडविण्या मुग्ध प्रियेचा
पवन किती सळसळतो आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.