सगुण – SAGUN


सगुण असो वा निर्गुण तो रे
प्रीत तयावर जडली माझी …
जळी स्थळी काष्ठी पाषाणी
मीच मूर्त त्यातून घडवली …
वात्सल्याचा भाव भरोनी
निर्गुण प्रतिमा सगुण जाहली …
तीन रत्नयुत ज्योत दिव्याची
अंतर्यामी एक उजळली …


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.