This ghazal speaks about living in the beautiful present instead of staying in the stagnant past. The ghazal also presents the poetess’ intention to protect life so that it flourishes. In the end, the poetess says it is better to not pursue the unreliable “mirage” called future.
सत्य शिव दिसे सुंदर! जायचे कशाला मी!!
साचल्या जलामध्ये, न्हायचे कशाला मी!!!
जीव हा जपायाला, हृदय मन फुलायाला
वाटते नकोसे जे, प्यायचे कशाला मी!
प्रश्न हा तुम्हा पडता, राहिली किती बाकी
उत्तरे मिळाया भागायचे कशाला मी!
निर्जरा जुन्या कर्मांची कुणी कशी केली
गीत ते इथे आता, गायचे कशाला मी!
शुभ्र वर्तमान सजल, ठाकले ‘सुनेत्रा’ चे
दूरच्या मृगजळास भुलायचे कशाला मी!
वृत्त – गा ल गा, ल गा गा गा, गा ल गा, ल गा गा गा.