जिंकणार सत्य आज
वाजणार सत्य आज
पाहताच मुग्ध भाव
लाजणार सत्य आज
शुभ्र मेघ अंबरात
हासणार सत्य आज
वीज नाचता नभात
वर्षणार सत्य आज
खोडसाळ जो तयास
चोपणार सत्य आज
आत्मरूप दर्पणात
भाळणार सत्य आज
नेत्र नयन लोचनात
झळकणार सत्य आज
वृत्त – गा ल, गा ल, गा ल, गा ल.