सांग प्रियतमा – SAANG PRIYATAMAA


This Ghazal is written in maatraavrutt(26 matraa). Here radif is absent. Kafiyas are tujalaa, gazalaa, majalaa,  taralaa(avataralaa), rujalaa, sajalaa.

सांग प्रियतमा, उपमा कुठली, देऊ मी तुजला;
ओंजळ भरली, रिती जाहली, थकल्या मम गझला.

कितीक युक्त्या, किती बहाणे, सुचेल ते केले;
उपाय आता, सर्व जाणण्या, सांग खरा मजला.

घडता घडता, उमगे काही,पुन्हा प्रश्न पडतो;
संपवण्या मग, त्या प्रश्नाला,पाउस अवतरला.

असंख्य रूपे, असली नकली, चकवुन बघ गेली;
जिद्दी आपण,दोघे म्हणुनी, प्रेमांकुर रुजला.

ऋतू कोणता, मला भावला, जाणुन काय करू;
नेत्रांमधुनी, अलगद माझ्या,हृदयी तो सजला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.