कुरूप खुळचट, बदकांमध्ये, हंस खरा आगळा
कंस शकूनी, जैसा मामा, किती मूर्ख बावळा
शुभ्र घनाला, इतुकी घाई, जाण्याची स्वर्गात
धो धो बरसुन, मोक्ष मिळवितो, कृष्ण मेघ सावळा
जैसे द्यावे, तैसे मिळते, ठाउक तरी कोणी
घेय कोहळा, कोणाकडुनी, देत तुरट आवळा
कोकिळ गातो, दडून गाणे, आंब्याच्या पर्णात
फांदीवरती बसून डोले, पोपट अन कावळा
भक्ष्य मिळविण्या, कीटक कोळी, विणतो जाळे एक
भिंतीवरती, कलेकलेने, रचुन सुबक सापळा
मात्रावृत्त (८+८+११=२७ मात्रा)