This Ghazal is written in thirty(30) matras. Radif of this Ghazal is Saayonaaraa. It’s meaning is, see you again or good-bye.
समुद्र गर्जे भरतीचा वादळ वदले सायोनारा
फेसाळत जल वाळुवरि शब्द उमटले सायोनारा
गुलबक्षीला फुलवाया सांजकिरण अवतरला सजला
निळ्या पाकळ्यांवर हलके तरंग उठले सायोनारा
प्रेमबावरा गुलाब चाफा सुगंध उधळित डुलणारा
प्राशुन त्यातिल चैतन्या दव कुजबुजले सायोनारा
रिमझिमणारी सर हसते झोके इंद्रधनूवर घेते
रंग फासुनी मेघांना स्वर थरथरले सायोनारा
हृदयी फुलता प्रणयभावना मौन विजेचे लखलखते
नीर सुनेत्रा नेत्रीचे हळु टपटपले सायोनारा