The Marathi word ‘Maay’ means mother. In this poem poetess meets her beloved mother in the dream. This dream is described in this poem.
स्वप्नामध्ये काल भेटली,
स्वप्नसखी मज सुंदर माय !
उरी उरी मग भेटुन तिजला ,
रडलो दोघी धाय धाय!!
तेच प्रेम अन तोच जिव्हाळा ,
अंतरातुनी फुटे उमाळा …
उसळुन आल्या भरतीच्या लाटा!!!
मुक्त कराया प्रेमाच्या वाटा….
उठेल आता माझी माय,
धरा तिचे थकलेले पाय !
उधळीत मोती हसेल माय…….
जणू दुधावर कोमल साय !
सत्यामध्ये येईल बाई ;
होऊन अमुची प्रेमळ बाय…………