In this poem poetess meets her beloved mother in the dream. This dream is described in this poem.
स्वप्नामध्ये काल भेटली,
स्वप्नसखी मज सुंदर माय !
उरी उरी मग भेटुन तिजला ,
रडलो दोघी धाय धाय!!
तेच प्रेम अन तोच जिव्हाळा ,
अंतरातुनी फुटे उमाळा …
उसळुन आल्या भरतीच्या लाटा!!!
मुक्त कराया प्रेमाच्या वाटा….
उठेल जेव्हा माझी माय
तिचे धरीन मी सुंदर पाय .. उधळीत मोती हसेल माय…….
जणू दुधावर कोमल साय !
सत्यामध्ये येईल बाई ;
होऊन अमुची प्रेमळ बाय…………