This Ghazal describes how Indians celebrate Diwali festival. Diwali is a festival of lights and new happy moments. In this season weather is very pleasant, sky is white and earth is green adorned with colourful flowers.
This Ghazal is in written in Aksharganvrutt, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA.
दिवाळी नव्या ह्या, क्षणाची, क्षणांची;
तमी तेवणाऱ्या, दिव्याची, दिव्यांची.
हळू दार उघडा, बघा पावलेही;
हळद माखलेल्या, उन्हाची, उन्हांची.
उभी औक्षणाला, करे आरती ही;
रणी झुंजलेल्या, मुलाची, मुलांची.
म्हणे शुभ्र आकाश, श्यामल धरेला;
सये नेस साडी, फुलाची, फुलांची.
धरा भार सोसे, खणा-नारळांचा;
तिला पैठणीही, हिऱ्याची, हिऱ्यांची.
‘सुनेत्रा’ तुझीही, गझल मयुर पंखी;
बकुळ अन जुईच्या, गुणाची, गुणांची.
वृत्त -ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.