This ghazal addresses social issues. This ghazal is written in aksharganvrutta. The vrutta used in this ghazal is LA GAA GAA, LA GAA GAA,
LA GAA GAA, LA GAA GAA.
अता वेळ कोठे दुपारी मला रे
नको दावू आता हुशारी मला रे
जरी ना कळाली न कोडी न चाली
तरी तेच म्हणती जुगारी मला रे
फुले तू दिलेली किती भावली ही
परी आवडे ती सुपारी मला रे
फुले चुंबण्याचा मला शौक भारी
म्हणोनी म्हणावे कुमारी मला रे
‘सुनेत्रा’ शराबी पुरी झिंगली अन
कळाली नशेची खुमारी मला रे
वृत्त- ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.