स्ट्राइकर – STRIKER


This poem is written in ‘Muktachhand’. Carom is the indoor game but playing carom is very interesting. In this game black and white pieces are used. Queen means red coloured piece. We use Strikar to obtain pieces. In this poem striker is imagined as wild animal. At last all black and white pieces Queen and cover fight unitedly with strikar and strikar lost his dark power.

कयारमच्या बोर्डावर फिरती
कृष्ण-धवल या पिसा थिरकती
स्ट्राइकर देतो त्यांना धडका
पाडत जातो फक्त सोंगट्या

राणीला पण जिंकून घेणे
इतुके सोपे कधीच नसते
राणीसंगे राजा असतो
राणीसंगे तोही लढतो

रंगावरुनी गुण न कळती
काळ्यामध्ये काही पांढऱ्या
पांढऱ्यातही काळ्या असती

स्ट्राइकर हा जणू गेंडा-रेडा
देई बघ धड्कावर धडका
सहकारी त्याला विटलेले
त्यांनी जणू मग बंडच केले

शह देण्याला या स्ट्राइकरला
राजाने मग युक्ती केली
गुणी सोंगट्या श्याम-श्वेत या
सहाय्य करण्या धावून आल्या

राणीच्या कव्हरानेही मग
कमाल केली धमाल केली…

धडक देऊनी स्ट्राइकरला
खड्डयामध्ये दिले फेकुनी
परत कधी ना उठावयाला
गेला मग तो रसातळाला
अंधाराच्या साम्राज्याचा
अंत असा हा घडून आला

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.