This is a musalsal ghazal containing kafiyas like, ‘kantak’, ‘champak’, ‘lambak’, ‘ranjak’, ‘gandhak’ etc. The radif of this ghazal is “bhet mala tu” which adds beauty to this this ghazal.
In this ghazal poetess is eager to meet her beloved, the divine, at any cost.
This ghazal is a great example of how symbolism can help express ideas beautifully. We encounter the presence of the higher self, God or true self in many forms.
मौन त्यागण्या, हितचिंतक वा, होउन चिंतक भेट मला तू
काष्ठ जरी तू, हृदयशून्य घन, होउन निंदक भेट मला तू
वादळ पिंजुन, तरल जाहले, होउन चंपक भेट मला तू
गुलाब मी जर, रक्षण करण्या, होउन कंटक भेट मला तू
उन्हामधे मी, मोजत तारे, जागी असुनी स्वप्न पाहते
कोसळले जर, उल्केसम मी, होउन खंदक भेट मला तू
आठवणींची पाने बांधुन, मोरपिसे मी तयात ठेविन
परीकथा त्या पुस्तकातली, होउन रंजक भेट मला तू
घाव सोसुनी टाकीचे मी, पाषाणाची मूर्ती बनले
देवत्वातुन मुक्ती देण्या, होउन भंजक भेट मला तू
चंदनबन तू, नागिण मी ती, नाग जरी तू, मीच केतकी
टेकाया मम शिणला माथा, होउन मंचक भेट मला तू
सुंदर बागा फुलवायाला, कीड फुलातिल नष्ट कराया
प्राणवायुच्या रेणूसंगे, होउन गंधक भेट मला तू
सजल ‘सुनेत्रा’ गझल बरसते, रीतभात मज, मुळी न कळते
नवे कायदे करण्यासाठी, होउन दंडक भेट मला तू
वाट पाहुनी थकले मी अन, भिंतीवरचे घड्याळ बनले
मम हृदयाचे हळवे स्पंदन, होउन लंबक भेट मला तू