ही शब्दांची अवखळ बाळे – HEE SHABDANCHI AVAKHAL BALE


This ghazal is written in 32 matras. Here Radif is not directly present. Radif and kafiya are dissolved in each other. This Ghazal describes power of words.

ही शब्दांची अवखळ बाळे गरगर मजला किती फिरविती
खोल खोल मग बुडी घेउनी चिंब भिजुन मी येते वरती

पूर नकोरे मज प्रेमाचा झुळझुळणारा झरा हवारे
हिरवळ मी त्या काठावरची तुषार माझ्या तनुवर उडती

नेत्रशिंपल्यामधुन उडाले पापणीतले निळसर पक्षी
सुंदर घरटे विणता विणता अखंड फांदीवर चिवचिवती

तनामनातिल अखंड नर्तन सतत पाहती अनाम डोळे
वीज चमकते या हृदयी अन मेघ होऊनी ते झरझरती

दूर जरी तू आठवणी तव मानस माझे प्रसन्न करुनी
अंगणातल्या प्राजक्तासम मम देहावर का टपटपती

झुळझुळ वारे ऊन कोवळे बकुळफुलासम मुग्ध सुनेत्रा
माळुन गजरा केसामध्ये पिंगा घाली गझलेभवती

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.