This ghazal is written in fourteen (14) matras. Here radif is absent. Kafiyas are nayananna, adharanna, samayanna, panatyanna etc.
हृदय सांगते नयनांना
रंगव मिटल्या अधरांना
चिमणी कंदिल समयांना
तेवूदे या पणत्यांना
बकूळ म्हणते भ्रमराला
सांग फुलाया कमळांना
या बाळांनो खुशाल या
नीर पाजते सगळ्यांना
पळवा मनिच्या भीतीला
डास ढेकणे झुरळांना
झरे कालवे जोहड व्हा
पाणी पुरवा धरणांना
सांज उतरता परतुन या
हसवा तुमच्या घरट्यांना