‘धारणात धर्म: ‘म्हणजेच ;
ज्याच्या योगाने व्यक्तीची, व्यक्तींची किंवा त्यांच्या समूहाची धारणा होत असते त्याला धर्म असे म्हणतात.
” धृ ” या धातुपासून धर्म शब्द बनला आहे आणि “धृ” याचा अर्थ धारण करणे असा आहे.
धर्म हा अध्यात्मिक क्षेत्रातील शब्द असून उपासना, तत्त्वविचार व सदाचार यांना धर्म म्हणतात. जरी असे असले तरी आजकाल आचारातील अनेक गोष्टींचा कर्मकांडाचा समावेश धर्मात होत गेला आहे. त्यामुळे धर्माचा सत्यार्थ धर्मापासून अनवधानाने दूर होत गेला आहे.
एकहजाद भिकारी किंवा याचक यांच्या अपेक्षेने भिक्षादान हा शब्द रूढ झाला आहे .
त्याचप्रमाणे दैनंदिन व्यवहारात पती-पत्नी, पिता-पुत्र, गुरु-शिष्य बंधू-बहीण राजा-प्रजा इत्यादी संयुक्त शब्दांतील धर्माचा अर्थ परस्परांशी परस्परांचे कर्तव्य होय.
सत्य अस्तेय, अहिंसा या धर्मानुयायी लोकांना सर्वकाळी समानतेने पटणाऱ्या गोष्टींचा नीती धर्मात समावेश होतो.
“वत्थु सहावो धम्मो” ही जैनधर्माने केलेली धर्माची व्याख्या आहे.
वस्तूचा स्वभाव तो वस्तूधर्म आणि आत्म्याचा स्वभाव तो आत्मधर्म!
आत्मा चैतन्ययुक्त आहे ज्ञानमय आहे व इतर वस्तू पुद्गल आहेत जड आहेत असे मानले जाते. व्यवहारात चैतन्ययुक्त आत्मा हा जीव आणि शरीर व पुद्गल याना अजीव म्हटले जाते.
जैनधर्म या सामासिक शब्दातील जैन हा शब्द जिन या शब्दाने तयार झाला आहे.
जिन म्हणजे कोण?
जिन हे आपणासारख्याच एकेंद्रीय ते पंचेंद्रिय सैनी,असैनी अस्या जीवांमधुन उत्क्रांत होत गेलेय जीवांमधूनच निर्माण होतात. जिन बनण्यासाठी पुरुषार्थाची जादू करावी लागते. अशी जादू किंवा चमत्कार घडण्यासाठी सम्यक श्रद्धेची ज्ञानाची चारित्र्याची आवश्यकता असते. आणि हे फक्त मनुष्य पर्यायातच शक्य असते.
जीवाचे बहिरात्मा, अंतरात्मा व परमात्मा हे तीन भेद असतात.
ज्या मनुष्यास सम्यकदर्शन-ज्ञान-चारित्र्य हे रत्नत्रय प्राप्त होते तो अंतरात्मा जिन बनू शकतो.
अश्या जिनदेवाकडून सांगितलं गेलेला जो सत्यश्रद्धानयुक्त विचार आणि आचार व त्याने के;ए;या जो उच्चार तो म्हणजे जैनधर्म होय.
kramash: