Akasharganvrutta used in this Ghazal is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA. In this Ghazal the poetess says, Now I am free. I don’t want to find out the answer within the question. I want to live life truly.
कसलाच छंद आता मज बांधणार नाही
हृदयी असेल घुंगरू मी नाचणार नाही
मी फोडले असेका ते वाजले असे का
प्रश्नात उत्तरांना मी शोधणार नाही
डोळ्यात सांडलेले तू चांदणे पहाना
या चांदण्यात आता मी भांडणार नाही
देशील का मला तू ते वचन स्वप्नवेडे
पिंगा अधांतरी मी मग घालणार नाही
जगण्यास टाळुनी या रक्तात डुंबणारी
होळी अशी जगाची मज भावणार नाही
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.