सूर्य उगवता हळदी तांबुस सोन्याचा गोळा
भाव ठरव तू स्वतः स्वतःचा तोलण्यास तोळा
उचल करंजी डब्यात भर तिज जा जा शाळेला
लगावलीच्या मोजुन मात्रा लगा लगा सोळा
दप्तर डोई करात लाठी चालव वेळेला
नको जवळ पण करू कुणाला जरी दिसे भोळा
वाटिकेतला सुगंध लुटण्या भृंगांचा फेरा
ना परवाना करण्यासाठी फुल चोळामोळा
कुटीत पंचम मुनी दिगम्बर पूज्यपाद स्वामी
भेद क्षत्रिया खेळण्यातल्या माशाचा डोळा