मनोरा – Tower


गळ्यात घालुन गळा डहाळी अक्षत पानांची उधळे
फुलांस कोमल खुडून अलगद अक्षत कुसुमांची उधळे

सरोवरातिल नीर सुगंधित हरित टेकडी हवा खुली
उंच मनोरा बिंबावरती अक्षत नाण्यांची उधळे

हूड निर्झरासंगे वारा खेळ खेळतो लपाछपी
सूप उडवुनी हातांमधले अक्षत धानांची उधळे

कार्तिकातली शुद्ध प्रतिपदा दिवे लावुनी आकाशी
अग्निपुष्प फिरवून गरगरा अक्षत ठिणग्यांची उधळे

कोर बिजेची भाळावरती रेखुन बाला चंद्रासम
अंगणातल्या निशिगंधेवर अक्षत ताऱ्यांची उधळे

, ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.