कशास घेऊ निवृत्ती मी मुसमुस करण्या
ना मी फुरसे साप विषारी फुसफुस करण्या
अत्तर बाकी खरेच अस्सल दरवळणारे
‘च’ ना भरीचा मम शेरातिल खुसखुस करण्या
नाटक बीटक करत कारणे मूळ शोध तू
निमताळेपण का पोसू रे धुसफुस करण्या
सर्पमित्र मदतीस धावले जिनानुयायी
भुजंग येता वेदीवरती भुसभुस करण्या
इंदुप्रकाशी सुई ओवते कोजागिरिला
इतुकीही नच थकले अजुनी घुसहुस करण्या