This Ghazal is written in fourteen(14) matras.
पूर्व प्रसिद्धी-साहित्य-लोभस दिवाळी २००७
रोखलेस जरि श्वासाला
कसे डांबशिल हृदयाला
बोलायाचे खूप जरी
कसे समजवू मौनाला
नको थोपवू प्रवाह तू
सोड आगळ्या हट्टाला
फक्त हवा जर उदो उदो
पगार दे मग भाटाला
धर्म सांगतो सर्वांना
पंथ न कुठला प्रेमाला
कक्षेमध्ये नको फिरू
झुगारून दे मार्गाला