This Ghazal is written in matravrutta(32 matras). Radif of this Ghazal is Priyatama. Kafiyas are Rahaves, nasaves, Fulaves etc. In this Ghazal the poetess says, emotions in human beings are necessary to live lively.
हृदयी माझ्या कुणी नसावे फक्त तू रहावेस प्रियतमा
फुकापासरिस मिळण्याइतुके स्वस्त तू नसावेस प्रियतमा
कशास दर्शन येता-जाता रिमोट हाती तुझ्याच असता
लष्करातल्या शिस्तीइतुके सक्त तू असावेस प्रियतमा
भाव भरोनी रिझव प्रजेला न्याय मिळावा मूक फुलांना
दहा दिशांचे पंख पसरुनी मस्त तू फुलावेस प्रियतमा
शुद्ध अंतरी रंग जरी तू वाऱ्याचा या सवंगडी तू
रेशिमवस्त्रे चोपुन नेसुन चुस्त तू दिसावेस प्रियतमा
मम हृदयाला चिंब भिजवुनी चिंब त्यात हो तू ही भिजुनी
त्यानंतर कर्मांचे राक्षस फस्त तू करावेस प्रियतमा