In this ghazal, our inner voice tells us to sing a song. When we sing by heart our inner voice takes a form of ghazal. In this ghazal it is explained how our mind sings, dances, and writes poems when we listen to our inner voice.
कोण तू कोठून येशी पाय हलके वाजले
गा सखे तू गीत आता फुल बोले आतले
मुग्ध मधुरा तू अबोली तू फुलांचे रानही
पाकळ्यांच्या ओंजळीने चांदणे मज पाजले
षोडशा की पोर्णिमा तू की फळांची पक्वता
घालुनी तव पैंजणे मी धुंद होऊन नाचले
कल्पना माझी म्हणोनी बरळले धुंदीत जे
शब्द ते पण नाचणारे फितुर तुजला जाहले
लेखणी घेऊन बसले कैक तुझिया भोवती
कळत नाही गूढ पण हे तू मला का निवडले
वृत्त- गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.