In this ghazal the poetess speaks about love – which has no limits or boundaries. This ghazal is written in GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA,GAA LA GAA GAA, GAA LA GAA Vrutta.
मुठ ही इवली तरीही कैद मी केले तुला
सूड तू उगवू नको रे पंख दे माझे मला
ठेविले काळीज माझे मी तुझ्या हृदयात रे
प्राशुदे पण गंध मजला माझिया श्वासातला
नाचवाया आवडे जर नाचुनी तूही पहा
बाहुली होईन मी होशीलका तू बाहुला
प्रीत ही धागा गुलाबी सत्य हे आहे जरी
मालकी पण दावता तू फास का तो जाहला
प्रेम का सौद्यात मिळते हाति ही तलवारका
उत्तरे मी काय देऊ भाबड्या माझ्या फुला
तू ‘सुनेत्रा’ शिंप आता चांदणे शब्दातुनी
स्वर्ग मग येईल दारी तो तुझ्या स्वप्नातला
वृत्त- गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.