कसे जायचे सागराच्या तळाला
पुसे मीन सैलावलेल्या गळाला
तळी सागराच्या किती मीन मोती
नवा प्रश्न वेताळ पुसतो जळाला
गिळुन मीन किल्ली बसे जी बुडाली
तुझ्या लेखणीने उघड तूच टाळा
विकायास मासे जरी जायचे तुज
कपाळी टिळा अन गळा घाल माळा
म्हणे मत्स्यकन्या मला ही हवा रे
खऱ्या सोनियाचाच पायात वाळा
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २०)
लगावली – लगागा/ ४ वेळा