कशास भेटणे तुला कधीतरी कधीतरी
दुरून तू पहा मला कधीतरी कधीतरी
तुलाच वाटते असे कठोर मी बनेल मी
मृदूच मी जरी फुला कधीतरी कधीतरी
कशास साठशी इथे विहीर वा तळ्यामधे
खळा खळा वहा जला कधीतरी कधीतरी
अता जरी बसून तू स्मृतीत मौन स्तब्धही
बनेन मी तुझा झुला कधीतरी कधीतरी
हवेस सांग वाहण्या सुगंध घेउनी तुझा
जरी मधेच थांबला कधीतरी कधीतरी
अक्षरगणवृत्त – मात्रा २४
लगावली – लगालगा/लगालगा/लगालगा/लगालगा/