चतुर्दशीच्या चंद्रासम तव मुखचंद्रावर प्रभा झळकते
अर्ध्या मिटल्या नयन पाकळ्या अधरांवरती हास्य विलसते
पद्मासन तव आसन शोभे नेत्रांमधुनी बरसे करुणा
खिरते वाणी सर्वांगातुन समवशरण भवताली वसते
दर्शन घेण्या अरिहंताचे स्वर्गामधुनी इंद्रही येती
मूर्त पाहुनी सजीव सुंदर झुळुक हवेची बघ झुळझुळते
पुनव चांदणे झरते जेव्हा नभांगणातिल तारे दडती
सिद्धशिलेवर शिरोमणीसम सिद्धप्रभूचे स्थान अढळ ते