वनवास तुझ्यासाठी – VANVAAS TUZYAASAATHEE


This Ghazal is written in twenty-six(26) maatraas. Radif is ‘Tuzyaasaathee'(तुझ्यासाठी) and kaafiyaas are shvaas, khaas, dhyaas etc.

करी लेखणी, माझी आहे, श्वास तुझ्यासाठी;
पापणीतुनी, गझल उतरते, खास तुझ्यासाठी.

अधरांचे हे, बंड म्हणू की, संयम वा खुन्नस;
जरी लपविले, नाव तुझे पण, ध्यास तुझ्यासाठी.

नेत्री भरते, घागर काळी, मोत्यांचे पाणी;
पाणीदार या, मोत्यांची रे, रास तुझ्यासाठी.

किती गोड हे, गुपीत अपुले, कळेल साऱ्यांना;
जगणे सुंदर, रोज नवी, आरास तुझ्यासाठी.

पक्वान्नाचे, ताट समोरी, रांगोळी भवती;
प्रेमभराने, किती भरविले, घास तुझ्यासाठी.

घटिका भरली, पळे पळाली, वर्षेही सरली;
पण दिवसाचे, चोविस सगळे, तास तुझ्यासाठी.

प्रेम सत्य अन, बाकी खोटे, कळले का आता;
अता न उरली, माझी प्रीती, भास तुझ्यासाठी.

डौलामध्ये, चालत येइन, त्यागुन पंखांना;
पुन्हा पुन्हा तो, पत्करेन वन-वास तुझ्यासाठी.

नकोस जुळवू, अता कुंडल्या, कोमल कुसुमांच्या;
गुंफुन त्यांना, बनवतील ते, फास तुझ्यासाठी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.