This Ghazal is written in sixteen(16) maatraas. In this Ghazal the poetess tells us about some critical problems in our society.
राब राबुनी कुणास दिडकी
दंडेलीने कुणास खिडकी
कुणास धमकी कुणास धडकी
घास अडकता कुणास उचकी
कुंभाराचे गाढव म्हणते
माझी माती माझी मडकी
बळीस सांगुन करा निवाडा
कुणास कापुस कुणास सरकी
बोटावरती गरगर फिरता
कुणास गिरकी कुणास फिरकी
डोळ्यांभवती झोप भिरभिरे
तरी चोर ना घेतो डुलकी
निर्माता अन ग्राहक हतबल
दलाल उचली बंडल पुडकी