This poem is parody poem or Vidamban kavya based on the original song ‘Nijalya tanhyavari mauli drushti sarakhi dhari.’
मूळ गीत- निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी
विडंबन गीत-काटे वांग्यापरी काकडी हट्ट केवढा धरी
काटेवांग्यापरी काकडी हट्ट केवढा धरी
तिखट मिठाचे सारण करुनी भरना तू अंतरी
चूल पेटवून ठेव भगूणे
तेल घाल तू अदमासाने
कडकडनाणाऱ्या तेलामध्ये
घाल जिरे मोहरी
हिंग हळदीची घाल फोडणी
हलवुन फोडी उदक सोडुनी
खिरा काकडी वाळूक असुदे
वाफ तया दे खरी
लखलखणारे ताट धातुचे
भरले वाळूक वाढ चवीचे
ठेव जोडीला गोड लोणचे
जेवीन आज घरी