This Ghazal is written in akshargan vrutta. Vrutta is GAA LA GAA LA, GAA LA GAA LA, LA GAA LA GAA, LA GAA LA GAA.
This Ghazal is Jul-kaafiyaa Ghazal.
पावसात चिंब चिंब खुलून गायचे मला
श्रावणात गीत गात तरूण व्हायचे मला
पुण्यवान मधुर माय मुलांफुलांस भेटता
हर्षभोर आसवात भिजून जायचे मला
जाळ शेगडीत द्वेष पुरे अता उणीदुणी
चंद्र चांदण्यात फिरत अजून न्हायचे मला
संशयी प्रियेस सांग नकोस कुस्करु फुले
एक एक कंटकास खुडून घ्यायचे मला
मोक्षधाम रम्य शांत कितीक जीव शुध्द हे
हसत फुलत त्या घरात रमून जायचे मला
वृत्त – गा ल गा ल, गा ल गा ल, ल गा ल गा, ल गा ल गा.