पुरे जाहली, अता परीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा
लपले त्यांना, देण्या शिक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा
मुला-फुलांना, सुखी ठेवण्या, प्राणपणाने, लढेन मी
सत्य जाणण्या, उपाय दीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा
बांध घालण्या, स्वैरपणाला, हवेच शासन, धर्माचे
प्रत्येकाला, सुंदर कक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा
जपती सारे, जीव जिवांना, हाच स्वर्ग रे, असे खरा
स्वातंत्र्याची, करण्या रक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा
विमान अमुचे, घेत भरारी, नेइल आम्हा, तव चरणी
घोडागाडी, नकोच रिक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा
मात्रा तीस=(आठ+आठ+आठ+सहा), ३०=८+८+८+६