गझल कसली बालिकाही गिरवते बाराखडी
वाचताना भासतेही चांदण्यांची फुलझडी
चांदणे फुलवीत जाते मुग्ध माझी भावना
काव्य मग घेऊन येते रंगलेली गुलछडी
गझल माझी मौन घेते लाविते दारा कडी
शेर माझे कोंडलेले तापले काढा कडी
तापल्यावर शब्द पुद्गल अर्थसुद्धा पांगले
भाव सुंदर जाणणारी हीच ती असते घडी
निर्जरेने प्राण माझा मोकळा झाल्यावरी
गरज ना दारास माझी म्हणतसे आता कडी
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.