कुणी कुणावर प्रयोग करिती स्वार्थ साधण्यासाठी
स्वार्थातच परमार्थ पाहती टोक गाठण्यासाठी
प्रात्यक्षिक हे फक्त असावे जीवाला जपण्या
बरे न पिळणे इतुके कोणा भोग भोगण्यासाठी
शब्द आंधळे पाडत जाता चरे काळजाला
संयम अपुला येतो कामी लेप लावण्यासाठी
पाउलवाटा झाल्या दर्शक घाट चढायाला
मार्ग बनविती स्पर्धक सारे फक्त धावण्यासाठी
बाईपण मम मौन जाहले कुचकट शेऱ्यांनी
फक्त एकदा साद मला दे गोड लाजण्यासाठी
मात्रावृत्त(८+८+१० =२६मात्रा)