हायहिल्स ती घालुन तेव्हां चालायाची टेचातं
कधी न गजरा आणि फुलांना माळायाची केसातं
ऐकत राही प्रश्न जरी ती उत्तर देई मौनातं
नयन झुकवुनी भल्याभल्यांना पाडायाची पेचातं
गर्द दुपट्टा सावरीत कधि पायघोळ ती मॅक्सीतं
नित्य लपेटुन मोहक साडी भिजे श्रावणी मेघातं
रंग सावळा खुलवण्यास ती क्रीम लावुनी गालांसं
गुलबक्षीसम अधर मुडपिता वीज सळसळे देहातं
भाग न घेते जिंकायाला कधी कोठल्या स्पर्धेतं
पण नजरेने हलवुन प्यादी तीच जिंकते खेळातं
कैक अवलिये चिंब जाहले तुझ्या फाल्गुनी रंगातं
सांग आणखी कितीजणांना पाडशील तू प्रेमातं
टपटप गझला पडतिल हलवुन प्राजक्ताच्या झाडासं
नेत्र ‘सुनेत्रा’ तुझेच असतिल त्या गझलांच्या शेरातं
मात्रावृत्त (८+८+८+५=२९मात्रा)