हिरव्या पानी फुलेल फुलवा
सुगंध उधळित हसेल मरवा
सतेज हळदी कुंकुमवर्णी
प्रीत प्राशुनी भरेल गडवा
मंदाग्नीवर मृदुल करांनी
काटेरी घन खुलेल हलवा
गोड हासऱ्या लेकींसाठी
फांदीवरती झुलेल झुलवा
अनुरागाचे गीत गुलाबी
रागामध्ये सुरेल बसवा
सत्त्यासाठी प्रेमासाठी
सैनिक अमुचा लढेल कडवा
वाण लुटाया संक्रांतीचे
सण मनभावन असेल बरवा
मात्रावृत्त (८+८=१६)