तुला भाजते जर मृदुल चांदणे
कसे भर दुपारी असे चालणे
जरी टाकवेना पुढे पावले
तरी तू मनाने शिखर गाठणे
इथे कार्य अर्धे करू पूर्ण ते
जिवा ध्यास घेऊ पुरे छाटणे
उगा कोश विणणे फुका उसवणे
गगन झेप घेण्या तया फाडणे
पुन्हा धीर देण्या बरे बोलुया
पतंगास वेड्या नको जाळणे
भुकेल्या जनांना भरव घास रे
बनव पुरणपोळी जमव लाटणे
उघड लोचनांना खरे स्वप्न हे
नभी सूर्य तळपे किती झोपणे
वृत्त – ल गा गा,ल गा गा, ल गा गा, ल गा.