हासता निर्व्याज्य पुष्पे हासणे टाळू नको
हासणाऱ्या या फुलांना माळणे टाळू नको
पुण्य आले धावुनी बघ हे तुला भेटायला
पुण्य तव शब्दात सुंदर गुंफणे टाळू नको
दुःख भरता जन्मभरचे वाहत्या अश्रुंमधे
आसवांना गाळण्याने गाळणे टाळू नको
द्यावया तव रंग अधरा वासरी ही फडफडे
वासरीला त्या गुलाबी वाचणे टाळू नको
नाटकातिल पात्र वेडे भेटते जेंव्हा तुला
तू ‘सुनेत्रा’ कुशल पुसणे बोलणे टाळू नको
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.