माझ्यामध्ये गझल उमटली
तुझ्यामुळे पण कविता रडली
रडता रडता हसू लागली
टपोर मोती उधळत खुलली
फुलली गळली पुन्हा प्रकटली
मुग्ध कळ्यानसम लाज लाजली
लाजेचीही लाज वाटता
ठिणगीसम ती फुलू लागली
पाऊस पाडून मग ठिणग्यांचा
लज्जेला ती जाळत गेली
निर्लज्जांसम निडर बनली
वीज होऊनी गगनी गेली
मेघांना ती चोपून आली
झरझर धारा वर्षत असता
त्यांच्यासंगे नाच नाचली
इंद्रधनूला झुलवून आली
सप्तरंग लेऊन मनाचे
कविता माझी बहरत गेली
कळ्या फुलांची बागच झाली
तिच्यामुळे तुज कविता सुचली
माझ्यासम ती तुला भावली
One response to “कविता रडली – KAVITAA RADALEE”
छान