व्हय व्हय -VHAY VHAY


काय लिवायचं
कसं लिवायचं
प्रश्न नाही पडत आता
लिव लिव म्हणताच आम्ही
लिवत सुटतो खाता पिता
शब्द टाकत अर्थ लावत
भाव करत वजन बघत
लिव लिवतो सटा सटा
मग परत तुमच्या चवकश्या
पुन्हा आमच्या उठाबश्या
असंच का तसंच का
म्हणायचं म्हणायचं
परत परत तरीसुद्धा
लीवच म्हणायचं
अपुनबी व्हय व्हय म्हणायचं
व्हाय व्हाय नाय म्हणायचं
गालभर गोड हसायचं
काम नीट करायचं
उडत उडत जगायचं


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.