हृदय माझं सजलं आहे
आनंदानं भरलं आहे
म्हणून लिहिते गाणी मी
खळाळणारं पाणी मी
पाण्या पाण्या वाहत जा
मातीला तू भिजवित जा
माती माती हसत रहा
अंकुरांनी फुलत रहा
किरणे झरतिल झर झर झर
अंकुर वाढे सर सर सर
झाड होईल डेरेदार
बसू सावलीत गारेगार
नवे वर्ष नवी हवा
निळ्या खगांचा नभी थवा
रंग प्रीतिचा नवा नवा