धार लावली पेन्सिल तासुन पात्याने ब्लेडच्या
टोकयंत्र वा गिरमिट फेकुन पात्याने ब्लेडच्या
पेन्सिलीतले टोक शिश्याचे तीक्ष्ण जाहल्यावरी
तिला पकडुनी लिहिली कविता शुभ्र कागदावरी
लिहिता लिहिता अक्षर अक्षर सजीव झाले असे
बकुळ फुलांसम सुगंध त्यांचा हृदयी माझ्या वसे
बकुळ तळीच्या मातीमध्ये बकुळ शिम्पते फुले
परिमल त्यांचा मातीमधुनी वाऱ्यावरती झुले
काव्यफुलातिल पराग कोमल रुजूदेत मन्मनी
काव्य फुलूदे हरेक हृदयी वेलीवर अंगणी
मात्रावृत्त (८+८+११=२७मात्रा)