पाऊस धारा वाऱ्यात
नाचत येती दारात
फुलवाल्या सुंदर बाला
फुले ओविती हारात
फिरवित छत्री निळी निळी
सखी निघाली तोऱ्यात
हूड वासरू भुकेजले
तोंड घालते भाऱ्यात
कशास तुलना हवी बरे
सुई आणखी दोऱ्यात
मुक्त मनाला हुंदडुदे
नकोस ठेऊ काऱ्यात
मुग्ध काव्य मम हृदयातिल
उठून दिसते साऱ्यात