This ghazal is written in 16 matras. Here radif is Hilaa and kafiyas are dhaval, bakul, naval etc.
रंगीत म्हणूकी धवल हिला
प्राजक्त म्हणूकी बकुळ हिला
ही रूप बदलते क्षणोक्षणी
मी सत्य म्हणूकी नवल हिला
ही वेलांटी मम श्वासाला
मी वक्र म्हणूकी सरळ हिला
ही नजर तुझीकी नजराणा
मी तीर म्हणूकी गझल हिला
अंदाज कधीही ना देते
मी मुग्ध म्हणूकी तरल हिला
कोसळते ही धो धो धो
मी जलद म्हणूकी सजल हिला
नेत्र पाकळ्या मिटता ही
मी कळी म्हणू की कमळ हिला